
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- विपरीत परिस्थितीवर आपल्या अथक परिश्रम, जिद्द व सातत्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करून एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी थेट बोरगाव येथील कांचन पांडुरंग पाटील हिने यश संपादन केले आहे. लोहा तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी पांडुरंग पाटील यांच्या कन्या कांचन पांडुरंग पाटील हिने अथक परिश्रम , जिद्द चिकाटी मेहनतीने आई वडिलांचे एमबीबीएसचे स्वप्न साकार केले आहे. घरची परिस्थिती साधारण असताना आपण बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कु कांचन पांडुरंग पाटील हिने गाठलेले शैक्षणिक यश हे तालुक्यातील शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
एका खेडेगावातील शेतकऱ्यांच्या मुलीने एमबीबीएसचे स्वप्न साकार केल्याने लोहा कंधार मतदारसंघाचे आ श्यामसुंदर शिंदे यांनी पण त्या मुलीचा सम्मान घरी जाऊन केला . व गावची कन्या एमबीबीएससाठी पाञ झाल्याचे समजताच ग्रामपंचायत कार्यालय बोरगांवच्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले यावेळी , उपसरपंच पुंडलीक पा बोरगांवकर , माधव पा गायकवाड , पांडुरंग पाटील व गावकरी मंडळीची प्रमुख उपस्थिती होती.