दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :-+आशिया खंङातील सर्वात उंच छञपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा हा मराठवाङ्यातील क्रांतीचौक , संभाजीनगर ( औरंगाबाद ) शहरात बसवण्यात आला . परंतु या शिवशिल्पाच्या अनावरण सोहळ्या वरून प्रशासनातील विसंवाद पुन्हा एकदा समोर आलेला आहे . १५ दिवसांपूर्वी पुतळा पुण्यातून तयार होऊन शहरात दाखल झाला . तसेच सुशोभिकरणाचे काम देखील पुर्ण झालेले आहे . आता फक्त मोठ्या भव्य दिव्य सोहळ्यात छञपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण बाकी आहे . या अनावरण सोहळ्याची तारीख महानगरपालिका तथा प्रशासकीय यंञनांनी जाहीर करावी . आणखी किती दिवस तारीख पे तारीख, सस्पेन्स कायम राहिल ही मागणी शिवप्रेमी नी केली आहे .
शिवजयंती समितीच्या पदाधिकारयांन सोबत प्रशासन चर्चा करायला तयार नाही . या सोहळ्याची कोणतीही पुर्वतयारी नाही . शिवजयंतीच्या दिवशी (१९ फेब्रुवारी ) ला तमाम शिवप्रेमी क्रांतीचौकात येऊन शिवपुजन करतात . सर्व शिवप्रेमी पुतळ्याला पुष्पहार घालू शकणार नाही म्हणून पर्यायी पुतळ्याची व्यवस्था कोठे करणार ? स्टेज कोठे टाकणार ? तसेच कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार ? या विषयाशी संपूर्ण शहरवासियांच्या भावना लक्षात घेता . प्रशासनाने त्वरीत तारीख जाहीर करावी ही मागणी औरंगाबाद शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार , समिती अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी केली .
शिवशिल्पाचे अनावरण कोणाच्या हस्ते ?
जशी जशी शिवजयंती (१९ फेब्रुवारी ) ही तारीख जवळ येत आहे तशी तशी शहरवासियांना याची उत्सुकता लागली आहे . परंतु या शिवशिल्पाचे अनावरण कोणाच्या हस्ते होणार हा प्रश्न देखील अनुउत्तरीतच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोहळ्याला येणार कि आँनलाईन स्वरूपात हजेरी लावणार ? का तसेच पर्यावरण मंञी तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रत्यक्ष उद्घाटन होणार याचा देखील सस्पेन्स आहे .
“महाशिववादन ” च्या वादकांची जोरदार तयारी :-
छञपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण तसेच भव्य दिव्य सोहळ्यासाठी शहरातील सर्वच नामांकीत ढोल पथक मिळून ” महाशिववादन ” करणार आहेत . या मध्ये तब्बल १००१ ढोल व ४०० ताशा या सह ध्वज पथक , झांज पथक व शिवकालीन कला पथक यांचा सहभाग आहे . याची पुर्व तयारी १५ दिवसांपासून मँनोर हाँटेल लाँन्स – क्रांतीचौक येथे सुरू आहे . या ” महाशिववादन ” चे आयोजक ऋषिकेश प्रदिप जैस्वाल यांच्या नेतृत्वात सुरू आहे . या ” महाशिववादन ” च्या कार्यासाठी संजय राखुंङे पाटील , सौरभ यादव यांच्या सह सर्व ऋषिकेश जैस्वाल मिञमंङळ चे पदअधिकारी , सदस्य व वादक परिश्रम घेत आहे .
शिवसेना , भाजप , एम. आय. एम. चे मुहूर्ता वरून वेगवेगळे मतभेद :-
शिवशिल्पाचे आनावरण हे शिवरायांचे वंशज यांच्या हस्ते व्हावे यासाठी अशी मागणी भाजप , एम. आय. एम. या पक्षांनी केलेली आहे. परंतु शिवसेना नेत्यांनी या पुतळ्याचे अनावरण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावे ही इच्छा व्यक्त केली. तसेच मराठा संघटना , मराठा क्रांती मोर्चा , शिवजयंती महोत्सव समितीने ( १९ फेब्रुवारी ) शिवजयंती च्या दिवशी अनावरण करावे हा मुद्दा उपस्थित केला .