
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- भारतात सर्वात मोठी गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये पाचव्या स्थानावर असणाऱ्या जपानने 2000 पासून आतापर्यंत 36.2 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे.
भारतातील जपानी औद्योगिक वसाहतीत सध्या 114 जपानी कंपन्या कार्यरत आहेत. भाषांतर, सेवापुरवठादार, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, निवासी प्रभाग या औद्यागीक वसाहतील कार्यरत आहेत.
ही गुंतवणूक प्रामुख्याने मोटार वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम डिझाईन आणि उत्पादन, वैद्यकिय उपकरणे, जीवनावश्यक वस्तू, वस्त्रे, अन्नप्रक्रिया आणि रसायने या क्षेत्रांमध्ये आहे.
भारतातील जपानी औद्योगिक वसाहतींच्या प्रगतीचा वार्षिक आढावा घेण्यासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि जपानचा अर्थमंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग विभाग यांच्यामध्ये बैठक आयोजित केली होती. यावेळी ही माहीती देण्यात आली. केंद्र सरकारने 14 उद्योगक्षेत्रांसाठी घोषित केलेल्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेला अर्जाच्या माध्यमातून जपानमधील उद्योगांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.