
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी वाडा
मनिषा भालेराव
वाडा :- वाडा तालुक्यातील कूयलू ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आदिवासी वस्ती असलेला धिंडे पाडा येथे विद्युत खांबमंजूर होऊन विजेचीजोडणी करण्याबाबत पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव अनंता वनगा यांनी मागणी केली आहे (दि. ११ फेब्रुवारी )रोजी त्यांच्या राहत्या घरी वाडा येथे धिंडे पाडा चे स्थानिक रहिवासी यांनी उपस्थित राहून चर्चा करण्यात आली आहे व अनंता वनगा यांनी पडतो पाहणी करून विजेची जोडण्याचे मागणी करण्यात आली आहे.
वाडा तालुक्यातील कुयलू ग्रामपंचायत अंतर्गत येणारया आदिवासी वस्ती असलेल्या धिंडेपाड्याला विद्युतखांब मंजूर होवून विजेची जोडणी करणेबाबतची मागणी पालघर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे सचिव अनंता वनगा यांनी केली. वाडा तालुक्यातील कुयलू ग्रामपंचायत अंतर्गत येणारा व आदिवासी लोकवस्ती असलेला तीस घरांचा धिंडेपाडा वर्षानवर्ष विजेअभावी अंधारात आहे.
परंतू या लोकवस्तीसाठी अजूनही विजजोडणी केलेली नाही,म्हणून या स्थानिक जनतेने अहोरात्र सर्वसामान्य गरीबांसाठी काम करणारे पालघर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे सचिव अनंता वनगा यांची त्यांच्या राहत्या घरी वाडा येथे भेट घेवुन आपल्या पाड्यातील समस्यांचा पाडा वाचला,याची दखल घेवुन अनंता वनगा यांनी या धिंडेपाडा येथे आपल्या कार्यकर्त्यांसोबत जावुन पहाणी केली.
त्वरीत ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांशी संपर्क करुन तोरणे ते धिंडेपाडा नवीन विद्युतपोल मंजूर करणेसाठी ठराव घेवुन वाडा विजवितरण कार्यालयात येवून अधिकारयांशी चर्चा करुन लवकरच आपण आपल्या कर्मचारयांर्फत तोरणे ते धिंडेपाडा अशी पाहणी करुन अंदाजपत्रक बनवून मंजुरीसाठी वसई येथे पाठवावे अशी मागणी करणेत आली त्यावेळी सोबत आमच्या दिनेश धिंडे धिंडेपाड्यातील स्थानिक रहिवासी उपस्थित होते!