दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई :-आज रोजी दिनांक 13 ऑक्टोबर 2021 वार बुधवार ,साठे नगर,अंबाजोगाई अंगणवाडी क्र-4
या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय,अंबाजोगाई व ग्रामीण विकास मंडळ,बनसारोळा. यांच्या संयुक्त विद्यमाने साठे नगर परिसरात HIV TESTING कॅम्प चे आयोजन केले होते. त्यात ICTC चे समुपदेशक धनराज पवार ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ- राजेश गोस्वामी.DSRC-गवळे राजकुमार यांनी
त महिलांना गुप्त आजार विषयी माहिती दिली.
धनराज पवार यांनी-HIV AIDS कोरोना विषयी समज, गैरसमज व उपचार या विषयी माहिती दिली .त्यात महिलांकडून काही आजार असतील तर त्वरित SRTR GMC हॉस्पिटलम अंबाजोगाई ला येऊन पुर्ण तपासण्या केल्या जातात.
यासाठीकार्यक्रम साठी अध्यक्ष म्हणून नगरसेवक मा अनिताताई जोगदंड या उपस्थित होत्या, अंगणवाडी कार्यकर्त्यां-लोमटे रोहिणी,मदतनीस- जोगदंड शुक्षाला तसेच ग्रामीण विकास मंडळ चे गौरी शिंदे, किष्किंदा पांचाळ,रेखा घाटे,भीमा कांबळे, सुनिल पारवे यांनी व्यवस्थित कार्यक्रम नियोजन करून हा कॅम्प यशस्वी पार पडला.