
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कंधार अधीक्षक पदावर कार्यरत असलेले हावगीराव किशनराव वाडीकर त्यांची नांदेड जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधक (रजिस्ट्रार) पदी नियुक्ती झाली आहे. श्री वाडीकर यांचा जीवन प्रवास कनिष्ठ लिपिक ते प्रबंधक अशाप्रकारे मेहनतीने आज या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांची नोकरीची सुरुवात कनिष्ठ लिपिक म्हणून दिवानी न्यायालय हदगाव येथे रुजू झाले.
नंतर नांदेड जिल्ह्यातील इतर न्यायालयात वेगवेगळ्या वरिष्ठ पदावर काम केले आहे ते लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या सर्वोच्च पदावर नियुक्त झाले आहेत . त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे त्यांच्या सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. त्यामध्ये कंधार न्यायालयातील वकील व अधिकारी व कर्मचारी यांना पुढील कार्याचा शुभेच्छा दिल्या आहेत.