
दैनिक चालु वार्ता
गंगाखेड प्रतिनिधी
गंगाखेड :- गंगाखेड तालुक्यातील मौजे धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडे दाखल असलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लागणारा निधी च्या प्रस्तावास मंजुरी घेण्यासाठी व अर्थसंकल्पीय अधिवेशन बजेट मध्ये तरतूद करून देऊन महाराष्ट्रातील सर्व राज्य संरक्षित मंदिराचे संबंधित असलेले मराठवाड्यातील सर्व मा.ना.मंत्री महोदयांनी व परभणी जिल्ह्यातील सर्व पक्षिय राजकीय क्षेत्रातून नेते मंडळी व लोक प्रतीनिधीनी सबधीत विभागाकडे शिफारस करुन गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन बजेटमध्ये तरतूद करून जिर्णोधार करण्यासाठीचे सर्वांनी सहकार्य करावे आसी धारासुर येथील ग्रामस्थांच्या वतीने निवृत्ती विठ्ठलराव कदम बोलताना म्हणाले की मराठवाड्यातील हा अनमोल ठेवा जतन करणे गरजेचे आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव सांस्कृतिक कार्य विभागाकडे दाखल केलेला आहे त्या दाखल असलेल्या प्रस्तावास मंजुरी घेऊन. अधिवेशन अगोदर होणाऱ्या. आढावा बैठकीमध्ये. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 1 2 3 टप्प्यांमध्ये का होईना. निधीची तरतूद करावी अशी विनंती केली आहे