
दैनिक चालु वार्ता
भूम तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भूम :- सविस्तर वृत असे कि,कर्नाटक सरकारचा शाळा व महाविद्यालयामधे ड्रेस कोड कायदया अंतर्गत मुलींना शाळा व महाविद्यालयात हिजाब परीधान करण्यावर बंदी आणली आहे. या निर्णयाचा भुम येथे ऑल इंडीया पँथर सेना व महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या संघटनांनी सोमवारी निषेध नोंदवित उप विभागिय अधिकारी भुम यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले. सदरील निवेदनात म्हटले आहे, भारताच्या राज्यघटनेतील मुलभुत अधिकारानुसार धार्मिक मुलभुत गोष्टी या श्रद्धा व परंपरा जपण्याचा व अचरणात अधिकार आहे. त्यामुळे इस्लाम धर्मानुसार श्रद्धेनुसार हिजाब परिधान करने मौलीक अधिकारात येते.
कोणत्याही कायदयानुसार कोणत्याही राज्याला हिरावुन घेता येऊ शकत नाही. कर्नाटक सरकार व उडपी पी ऊ काॅलेज ने विद्यार्थ्यांमधे हिजाब वरुन विष पेरण्याचे काम केलेले आहे. यामुळे हिजाब बंदीचा निर्णय मौलीक अधिकाराची पायमल्ली करणारा असल्याने तो निर्णय मागे घेण्यात यावा. अशी मागणी दोन्ही संघटनेच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी चंद्रमणी गायकवाड ऑल इंडीया पँथर सेना मराठवाडा कार्याध्यक्ष, आसिफ जमादार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मुस्लिम फ्रंट,आलीम शेख शहर अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, महेंद्र गायकवाड तालुका अध्यक्ष पॅथर सेना, रोहित गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष पॅंथर सेना, कदीर भाई शेख उस्मानाबाद सल्लागार मुस्लिम फ्रंट, अज्जु वाघमारे अमोल शेलार,आमोल शिंदे,संदीप सरवदे, मोईन तांबोळीआदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.