
दैनिक चालु वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनिधी
अंगद कांबळे
म्हसळा :- तीनगांवची स्वयंभू श्री चिंचबायमाता जागृत देवस्थान म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा आज शके 1943 माघ शुद्ध द्वादशी अभिषेक कार्यक्रम रेवली, बनोटी, गणेश नगर या तीन गावाच्या वतीने देवीची प्रतिष्ठापना पूजा व होम उद्धघाटन सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी भाविकभक्ताची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उदघाटन वकील श्री राजेश महादेव पाटील यांच्या उपस्थित करण्यात आले देवीभक्तानी देवी दर्शन तीर्थ प्रसादाच व महाप्रसादाचा लाभ घेऊन आनंदमय वातावरणाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे.श्री हरी अंबाजी म्हात्रे बनोटी, श्री विजय विठोबा पाटील रेवली, प्रमुख अतिथी श्रीम.छाया म्हात्रे सभापती (पंचायत समिती म्हसळा ), श्री अनंत हरी कांबळे सरपंच बनोटी, श्री लोमेश नाकती, श्री अनंत पाटील (तीनगांव पोलीस पाटील )श्री गणपत गाणेकर, श्री तुकाराम पाटील अध्यक्ष रेवली, श्री गोविंद कांबळे, श्री महादेव पाटील पुजारी, श्री दिलीप पवार श्री महादेव गाणेकर तीनगाव देवस्थान अध्यक्ष, श्री देवजी गाणेकर सचिव, गोविंद कांबळे खजिनदार तीनगांव ग्रामस्थ मंडळ /महिला मंडळ व मुंबई मंडळ रेवली, बनोटी, गणेश नगर या कार्यक्रमास ग्रामस्थ भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्तित होते.