
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- काल ( दि. १४ फेब्रुवारी ) रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास पैठण रोड वरून रवींद्र देसले हे त्यांचे दैनंदिन कार्यालयीन काम संपवून दुचाकीने वर घरी जात होते . अचानक , चुकीच्या दिशेने विरूद्ध बाजूने येणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकी मोटरसायकल स्वाराने वेग नियंत्रणात न आल्याने दोन्ही गाङ्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली . त्यामुळे देसले यांचे देखील गाङीवरील नियंत्रण सुटले व तेही खाली रस्त्यावर पडले त्यामुळे त्यांना पायाला गंभीर इजा झाली आणि पायाचे हाड देखील मोडले असल्याचे समजले.
तेव्हाच तेथून अँब्युलन्स हेल्प रायडर्स परिवारातील सदस्य अस्मिता पांडे यांनी ते पाहिले . लगेचच त्यांनी घटना स्थळावर जात देसले यांना धीर दिला . व त्वरीत त्यांना स्वतःच्या खाजगी वाहनात घेऊन घाटी रुग्णालयात पोहचल्या व तिथे देसले यांना वेळीच उपचार मिळवून दिले . त्यामुळे अपघातग्रस्त देसले यांची प्रकृती स्थिर राहिली त्यांनतर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना फोन करून सदरील अपघाताची माहिती दिली . त्यांच्या परिवारातील सदस्य त्वरित घाटी मध्ये आले त्यांनी मदत केल्या बद्दल अँब्युलन्स हेल्प रायडर्स परिवारातील अस्मिता पांडे यांचे आभार मानले , ते बोलले आम्हांला तुमचा अभिमान वाटतो . एक महिला असून देखील ज्या पद्धतीने तुम्ही अपघात ग्रस्ताला मदत केली खरच तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे .