
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
नांदेड :- कामठा येथील प्रसिद्ध असलेले प्रभू विश्वकर्मा मंदिर येथे प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्ताने नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी भेट दिली असून यावेळी सर्व भाविक भक्तांना विश्वकर्मा जयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांच्यासोबत कैलास पाटील, नागनाथ देशमुख, सत्यनारायण आलेगावकर, किशन कामठेकर, बबलू पांचाळ, आनंदराव पिंपळगावकर, पांडुरंग पिंपळगावकर, आत्माराम दाताळकर, सुदाम कामठेकर, रंगनाथ पांचाळ, उत्तमराव कोलंबीकर, व्यंकटराव लालवाडीकर, रामदास पांचाळ, संतोष पांचाळ, तुकाराम पांचाळ, सत्यभामा पांचाळ, सावित्री लोहगावकर, सुनिता कामठेकर यांच्यासह आदीजण उपस्थित होते.
प्रभु विश्वकर्मा जयंती च्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी हनुमानगड येथे देखील विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने उपस्थिती लावून भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या. तसेच कामठा येथे भव्य दिव्य उभारलेल्या प्रभू विश्वकर्मा मंदिरात देखील भेट दिली. या मंदिरास आ. बालाजी कल्याणकर यांनी आपल्या स्थानिक आमदार निधी मधून सभामंडपा साठी दहा लक्ष रुपये दिले आहेत. येथील कार्यक्रमास उपस्थिती लावून भावीक भक्तांना शुभेच्छा दिल्या.