दैनिक चालू वार्ता
मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडा.हिरवे/घाणवळ या ग्रुप ग्राम पंचायतीचा भोंगळ कारभार या ग्राम पंचायतीतील कारभार हा या ठिकाणी काम करत असलेल्या सामान्य क्लार्क व लेखपाल यांनी ठरवाव सरकारी कामकाजाच्या वेळे नुसार सकाळी १०ते संध्याकाळी ०५या वेळे पर्यंत रविवार व शासकीय सुटी सोडून इतर टायमाला ऑफिस उघड राहायला पाहिजे परंतु या ग्रामपंचायत मध्ये अस होत नाही एखाद्या वेक्तीला जर एखादया कामा साठी ग्रामपंचायत ला जायच असल तर सकाळी 9ते11 वाजे पर्यंत इतर हातातील कामे टाकून सकाळीच जाव लागत 11वाजे नंतर मात्र या ग्रामपंचायतला सरळ सरळ कुलूप ठोकलेल असत आणि जरीही चुकून उघड राहील तरी त्या ठिकाणी काम करणाऱ्या लेखपालाची दादागिरी ची भाषा असते तो सरपंच नाही ग्रामसेवक नाही असे उडवा उडवीची उत्तरे एकूण सामान्य माणसाला माघारी परत आपल्या घरी यावे लागते या ग्रामपंचायत मध्ये जे ग्राम सेवक आहेत त्यांच्या कडे इतर दुसऱ्याही ग्रामपंचायत च कामकाज आहे इथ कुठलाही पर्मनंट ग्रामसेवक नाही शासनाने वरील जागा त्वरित भरावी व नागरिकांची होणाऱ्या गैर सोई मुळे त्यांना स्थानिक ग्रामसेवक देऊन योग्य ती सोय करावी.