
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
अमृतसर :- पगडी घालून कोणी सरदार होऊ शकत नाही. पंजाबमध्ये पंजाबी लोकच राज्य करतील. कोणतेही नवीन मॉडेल या ठिकाणी चालणार नाही. ना मोदींचे ना केजरीवालांचे. मॉडेल फक्त कॉंग्रेसचे आणि पंजाबी लोकांचेच चालेल, असे कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या. प्रियांका गांधी यांनी आज कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रुपनगर येथे रोड शो केला. त्यांनी ट्रॅक्टरवर बसून रोड शो केला. यावेळी त्यांच्यासमवेत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी होते. त्यानंतर त्या अमृतसरला रवाना झाल्या. तेथे त्या पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचा प्रचार करत आहेत.
तसेच अमृतसर पश्चिम भागात बटाला रोड भागात देखील जाणार असून तेथे रोड शो आणि डोअर टू डोअर प्रचार करणार आहेत. यादरम्यान त्यांनी लोकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पगडी घातल्याने कोणी सरदार होऊ शकत नाही. आपल्यासमोर भाजप आणि आम आदमी पक्षाचे नेते आहेत. दोघेही एकच खेळ खेळतात. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांना पाहा. त्या दोघांची सुरवात कोठून सुरवात झाली. या दोघांची सुरवात संघापासूनच झाली आहे. यापैकी एक जण गुजरात मॉडेलची गोष्ट मांडतात, तर दुसरे दिल्ली मॉडेलची. आशा यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या