
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस आणि स्थानिक पक्षांची तिसरी आघाडी अशी चुरस पाहायला मिळणार आहे. भाजप पूर्ण ताकदीनं जिंकण्यासाठी वेगवेगळे मास्टरप्लॅन तयार करत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका फोनमुळे एका राज्यातील सत्तेचं समीकरण बदलण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे या राज्यात लवकरच राजकीय भूकंप येऊ शकतो अशी चिन्हं आहेत. सध्या तमिळनाडूमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे केव्हाही सत्तेची बाजी पलटण्याची शक्यता आहे. राजकारण तापलेलं असताना आणि निवडणुकांच्या रणधुमाळीत अमित शाह यांनी द्रमुक आमदार कनीमोझी यांना फोन केल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना मोठं उधाण आलं आहे. एक महिन्यापूर्वी अमित शाह यांनी हा फोन केला होता