दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. कोरोना नियमांप्रमाणे ते विलगीकरणात राहणार आहेत. विलगीकरणात व्हर्च्युअल काम सुरुच ठेवणार आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी विलगीकरणात राहावे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत सांगितले की, ‘माझी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करत विलगीकरणात राहणार आहे. यापुढील सर्व कामे व्हर्चुअल करेन…’ त्यासोबतच ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेय की, बुधवारी संत शिरोमणी रविदास जयंती कार्यक्रम आहे,याला व्हर्चुअली उपस्थित राहणार आहे.