
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर:- तालुक्यातील आष्टी जवळील परतवाडी तांडा येथे मंगळवार रोजी आठवडी बाजाराला सुरुवात करण्यात आली आहे परतवाडी गावातील हनुमान मंदिर जवळ आठवडी बाजार भरवण्यात आला या बाजार सकाळी मारोती मंदिर वर नारळ फोडून पेढे वाटून सुरुवात करण्यात आली, नंतर ग्रामपंचायत कर्मचारी गणेश आडे आणि मुकेश आडे यांनी बाजार आपल्या गावात भरला म्हणून आनंद साजरा करत दोघांनी १० किलो भजे आणि १० किलो जिलेबीचे वाटप केले.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा टेकाळे व व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष हब्बीच भाई यांचा सत्कार करण्यात आला, या बाजाराला गावकऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. या वेळी सरपंच सीताराम राठोड, उपसरपंच रामेश्वर आडे, तंटामुक्ती अध्यक्ष शेषेराव आडे ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब आडे, आष्टी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर जाधव, नाना जगताप, विकास मोरे, गोविंद आडे, गणेश आडे, मुकेश आडे. राम राठोड, गोरख आडे, बाळू जगताप यासह गावातील नागरिक उपस्थित होते.