
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- अमरावती मनपाचे आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांच्यावर शाही फेकणाऱ्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांच्या कडे लोहा तहसिलदार मुंडे मार्फत आर्य वैश्य युथ व महासभेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. पुढे निवेदनात असे नमूद केले की,
अमरावती येथील महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांच्यावर ओव्हर बीज अमरावती याठिकाणी शाई फेक झाली या गोष्टीचा जाहीर निषेध करतोत.
डॉ प्रविण आष्टीकर यांच्यावर शाई फेक हल्ला करणार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी लोहा आर्य वैश्य यूथ व महासभेच्या वतीने लोहा तहसिलदार याना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष किरण सावकार वटमवार ,नगरेश्वर मंदिर लोहाचे अध्यक्ष दिनेश सावकार तेललवार, उपाध्यक्ष सूर्यकांत पालीमकर, सचिव नामदेव कटकमवार, प्रशांत पातेवार, बालाजी रहाटकर, प्रविण अंकुलवार, शशिकांत बिडवई, आर्य वैश्य यूथ लोहा तालुका अध्यक्ष संतोष चेऊलवार, उपाध्यक्ष शुभम सावकार उत्तरवार आदी उपस्थित होते.