
दैनिक चालु वार्ता
नांदेड :- जोशिसांगवि येथील प्रदीपभाऊ मगरे यांची रिपब्लिकन सेना युवा जिल्हाउपाध्यक्ष दक्षिण पदी निवड करण्यात आली. रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचा नांदेड दौरा असल्याने नांदेड जिल्ह्यातील शेकडो तरुणांनी आनंदराज आंबेडकर साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी काल रिपब्लिकन युवा सेनेत प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत राहुलभाऊ चिखलिकर उ.जिल्हाध्यक्ष आणि प्रशांत भाऊ गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली अमोल भाऊ पट्टेवाड (युवा उपाध्यक्ष), नंदू पोहरे (शहर उपाध्यक्ष(, गणेश गवारे (नांदेड तालुका संघटक), अक्षय वाघमारे (लोहा तालुका सचिव), विकास पकाने (जिल्हा उपाध्यक्ष) अशा इतर अनेक तरुणांचा रिपब्लिकन युवा सेनेत प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.