
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- शिक्षण आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी काय उपक्रम राबवायचे आहेत यासह अनेक शैक्षणिक विषयावर शिक्षण परिषदेत चर्चा करण्यात आली .साधन व्यक्तीने सविस्तर मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के , डायट चे प्रा चंद्रकांत धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी पी .बी गुट्टे यांच्या उपस्थितीत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पार पडली . ब्रँच शाळेचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष इमाम लदाफ यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली.
यावेळी केंद्र प्रमुख एन एस कसबे, केंद्रमुख्याध्यापिका बी एम गुंटे, साधन व्यक्ती कातोरे , मुख्याध्यापक शिबधन राठोड, मुख्याध्यापक खेडकर, केंद्रे मॅडम, साधन व्यक्ती एम एन केंद्रे,मुख्याध्यापक एच जी पवार, जय महाराष्ट्र प्रा शाळेचे
मुख्याध्यापक संतोष भालेराव ,दिलीप सोनवणे।.शिक्षक पतसंस्थेचे माजी सचिव ज्ञानोबा घोडके, गायकवाड, आर जी वाघमारे, आर एस कदम, डी बी पवार, डी व्ही कोरडे, टी आय शेख, सौ एस बी वळसे, बी एन गवाले, आर आर पिठ्ठलवाड यास शिक्षक उपस्थित होते. संचलन गंगाधर वाघमारे यांनी सुरेख संचलन केले प्रास्ताविक केंद्रप्रमुख कसबे यांनी केले.