
दैनिक चालु वार्ता
भंडारा प्रतिनिधी
राजेश गेडाम
भंडारा :- सर्वसामान्यांना तक्रारी व गाऱ्हाणी मांडण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे जिल्हास्तरीय लोकशाही दिन होय. जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने व कोरोना विषाणूचा प्रादुर्भावही असल्याने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत नव्हते. मात्र आता काही कालावधीच्या खंडानंतर जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार 7 मार्च रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे.
या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी जनतेच्या तक्रारी, अर्ज संकिर्ण शाखा जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे (न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील प्रकरणे, सेवा विषयक, आस्थापना विषयक, सामुहिक कामासंबंधित तसेच तालुका लोकशाही दिनी सादर न केलेल्या तक्रारी वगळून) दोन प्रतीत स्वीकारण्यात येतील. जिल्हा लोकशाही दिनाकरिता तक्रार निवेदन करणाऱ्या नागरिकांनी मास्क घातल्याशिवाय कार्यालय परिसरात प्रवेश करू नये. सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी कळविले आहे .