
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
पारनेर :- पारनेर तालुक्यात अनेक शाळा नादुरुस्त असून संरक्षण भिंतीची देखील दुरुस्ती होण्याची गरज पाहून दुरुस्तीसाठी मा. प्रताप पाटील शेळके उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे पाठपुरावा करून ३ कोटी १६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांनी दिली.पारनेर तालुक्यातील अनेक गावांतील प्राथमिक शाळेच्या इमारती नादुरुस्त झालेल्या होत्या.तसेच काही शाळेच्या संरक्षण भिंतीही नादुरुस्त झालेल्या होत्या.
सर्व प्राथमिक शाळेची पाहणी करून या शाळेच्या इमारती व संरक्षण भिंत दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे.या सर्व प्राथमिक शाळेच्या इमारती व संरक्षण भिंत दुरुस्ती कामांची बांधकाम विभागामार्फत निविदा कार्यवाही करण्यात येणार आहे.त्यामुळे पारनेर तालुक्या- तील बहुसंख्य प्राथमिक शाळा दुरुस्ती व संरक्षक भिंत दुरुस्तीचे कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सोई सुविधा मिळणार असल्याचेही सभापती दाते सर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. प्रताप पाटील शेळके यांच्या माध्यमातून हा निधी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.एवढा मोठ्या प्रमाणात पारनेर तालुक्याला निधी मिळाल्याने तालुक्यातील शाळा खोल्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागणार असून संरक्षण भिंती ही दुरुस्ती होणार आहे.तर त्यामुळे लहान मुलांना ज्या शाळा रस्त्याच्या बाजूला आहेत शाळेच्या वेळेत लहान मुले खेळताना रस्त्यावर येतात. शाळेस संरक्षण भिंत झाल्यास लहान लहान मुले सुरक्षित होतील.लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचेही सभापती दाते सर यांनी सांगितले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिखोल, काळू नगर – १ लाख रुपये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसे – ५ लक्ष रुपये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांजेवाडी – ८.१० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देविभोयरे – ८.१० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धवनवाडी – १० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निघोज, गावठाण -५ लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळा निघोज -५ लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चासकरवाडी, लोणीमावळा-१० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंड वस्ती, निघोज- १० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळे वस्ती, निघोज- ५ लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोहकडी टोणगेवस्ती -१५लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लामखडे वस्ती, निघोज -१० लक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडीलगाव -५ लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोहकडी, गावठाण -१० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारणवाडी, हांडे वाडा-२ लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसपुर ,ढगेवाडी – २ लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्जुले हर्या, वाफारेवाडी -१.७० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवाडी, जांभुळवाडी -१ लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिखोल – ५ लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववाडी-१० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूरपठार- १० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरोबाची वाडी -१०लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव तुर्क- १० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे खुर्द, गावठाण -५ लक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे खुर्द, काळीपाईन -१० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे, दिलबरशाहा वस्ती -१० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी आळे-१० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरोडी- १० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळकुटी-१० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारखिंडी -१० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक अक्कलवाडी १० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे कोरडा-१० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रे बुद्रुक -१० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राळेगण थेरपाळ गावठाण -१० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घावटेवस्ती, राळेगण थेरपाळ -५ लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माजनपूर -१५ लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस -१० लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळकूप,कदम वस्ती – ७ लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळकूप -१५ लक्ष या कामांचा समावेश आहे.