दैनिक चालु वार्ता
भुम तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भूम:- भूम शहर शिवजन्मोत्सव निमित्त ज्येष्ठ भारुड सम्राट ह भ प लक्ष्मण महाराज राजगुरू यांच्या समाज प्रबोधन पर भारुडाचा कार्यक्रम भूम नगर पालिकेच्या समोरील प्रांगणात संपन्न झाला.यावेळी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विठ्ठल शेंडगे,विश्वंभर गाढवे यांच्या हस्ते केले.
यावेळी कॉग्रेस आय भूम तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे,भाजप तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर,शहराध्यक्ष शंकर खामकर,रा़ कॉ भूम शहर अध्यक्ष बाजार समिती सभापती रमेश मस्कर,आबा मस्कर ,शहर उपाध्यक्ष अमोल सुरवसे ,तानाजी गाढवे,जयंती समिती अध्यक्ष प्रतिक मस्कर,विठ्ठल बाराते यांचेसह शिवजन्मोत्सव समितीचे व सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकृमापूर्वी कु.आराध्या लाखे,मारूती अजय शेंडगे यांनी आपल्या थोडक्या शब्दात जयंती उत्सवानिमित्त भावना व्यक्त केल्या .
यावेळी प्रबोधन करताना भारुड सम्राट लक्ष्मण महाराज राजगुरू म्हणाले की,मनामध्ये भक्तिभाव असायला पाहिजे आणि या भक्तीमधून जन्मदात्याची सेवा झाली पाहिजे .अध्यात्मिक धार्मिक विचार आत्मसात केले पाहिजेत तरच मनाला शांती मिळेल असा विश्वास भूम शहर सार्वजनिक शिवजन्म उत्सवाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ भारूड सम्राट ह भ प लक्ष्मण महाराज राजगुरू यांनी व्यक्त केला .