
दैनिक चालु वार्ता
चंद्रपूर प्रतिनिधी
प्रदिप मडावी
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी,२०२१ मध्ये झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत अनु.जाती(SC), अनु.जमाती(ST), व इ.मा.व. (OBC) च्या राखिव जागावर निवडून आलेल्या सदस्यांना निवडून आल्याच्या तारखे पासून एक वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. एक वर्षांची मुदत १८ जानेवारी,२०२२ ला पुर्ण झाली असून, ज्यांनी अजुनही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने समाप्त करू नये अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी व प्रदेश महासचिव अब्दुल जमिरभाई यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी चंद्रपूर कडे केली आहे.
ज्या सदस्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांना संबंधित तहसीलदार यांचे मार्फत नोटिसा बजावल्या जात आहे त्या मुळे अशा सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यात काही सरपंच तर काही उपसरपंच यांचा समावेश आहे. जानेवारी, २०२१ मध्ये ग्रा.प.च्या निवडणूका झाल्या नंतर लगेच फेब्रुवारी,२०२१ पासुन कोरोनाच्या (Covid 19) दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली आणि शासनाने मार्च,२०२१ पासून कडक निर्बंध लागू केले. कोरोनाची दुसरी लाट तेवढी प्रभावी होती की यात अनेकांना आपला जिव गमवावा लागल्याने लोकांत भिंतीचे वातावरण होते. कडक निर्बंधांमुळे प्रवासावर आणि लोकांच्या संपर्कावर बंधने होती.
कोरोना निर्बंधांमुळे शासकीय कार्यालयातही ५०% अधिकारी, कर्मचारी उपस्थितीचे बंधन असल्याने शासकीय कामे ही प्रभावीत झाली होती. त्या मुळेच जात वैधता प्रमाणपत्राचे अनेक प्रस्ताव प्रलंबित राहीले. जानेवारी,२०२२ मध्ये कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्याने प्रस्तावातील त्रृटिची पुर्तता करणे सुरू असल्याने अनेक उमेदवारांना वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्यास विलंब होत आहे. कोरोना काळ व शासनाने लावलेले कोरोना निर्बंध लक्षात घेता ग्रा.प. च्या राखिव जागावर निवडून आलेल्या परंतु मुदतीत प्रमाणपत्र सादर न करू शकणाऱ्या उमेदवारांवर तातडीने अपात्रतेची कारवाई करू नये.
गोंडवाना गणतंत्र पार्टी ने केलेल्या मागणी नुसार तीन महिन्याची शिथिलता मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण उमेदवारांनी आपापली प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे व आपले पदे/सदस्यत्व कायम ठेवावे. सदर निवेदन तहसीलदार राजूरा यांच्या मदतीने जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले