
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजुर्डे पाटिल
गंगापूर :- गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद ते येसगाव या रोडवर पडलेले खड्डे बुजवून डांबरीकरण न केल्यास शिवजयंतीला १९ फेब्रुवारी रोजी सकाळी मुंबई मंत्रालयासमोर किंवा गंगापूर येथील तहसिल कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा योगेश दिवटे यांनी दिला आहे. उपअभियता सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग गंगापूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की तुर्काबाद ते येसगाव या रोडवर दहा ते पंधरा गावातील नागरिकांचे दररोज वाळुंज औद्योगिक वसाहतीत रोजगारासाठी दवाखाने, बाजारपेठ, शेतकर्यासाठी खत कीटकनाशक, औषध, मुलांसाठी शाळा असे अनेक दररोजचे दळणवळणासाठी जाण्या येण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
तुर्काबाद ते येसगाव पर्यंत रस्ता अतिशय खराब होऊन त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. एवढेच नव्हे तर तुर्काबाद ते येसगाव घोडेगाव, तांदूळवाडी या रस्त्याचे काम मंजूर असताना बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे, तसेच लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षाने रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू होऊ शकले नसून कीमान तुर्काबाद ते येसगाव ०६ की.मि. रोड वरील खड्डे बुजून तात्काळ डाबरीकरण करावे, तसेच रुंदीकरन करावे. वरील कामे होणे हे जनतेसाठी आवश्यक आहे.या कामाला जबाबदार असलेले अधिकारी / पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी ही कामे न केल्यास . १९ फेब्रुवारी रोजी सकाळी मुंबई मंत्रालयासमोर किंवा गंगापूर येथील तहसिल कार्यालयासमोर प्रशासनाच्या निषेधार्थ आत्मदहन करण्यात येणार असल्याचा इशारा योगेश दिवटे यांनी दिला आहे.