
दैनिक चालु वार्ता
मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडा :- नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक २३फेब्रुवारीला होत आहे,या निवडणुकीसाठी शिवशेण ८आणि जिजाऊ सामाजिक संघटनेच्या २अस्या १०जणांचा गट स्थापन करण्यात आला आहे,या गटातील शिवसेनेचे उमेदवार अमोल पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे,त्या मुळे मोखाडा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार हे निश्चित आहे. एका महिन्यांपूर्वी मोखाडा निवडणूक झाली १७ सदस्य संख्या असलेल्या नगरपंचायती मध्ये या निवडणुकीत शिवसेना ८,राष्ट्रवादी ४,जिजाऊ संघटना २,भाजप २आणि काँग्रेस १असे उमेदवार निवडुन आले आहेत.
ही निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढवली होती त्यात पूर्ण बहुमत असल्याने शिवसेनेचे अमोल पाटील यांचा विजय निश्चित असून मोखाडा नगरपंचायतीवर पुनः भगवा फडकण्याच चिन्ह आहे तसेच काँग्रेस,राष्ट्रवादी,बहुजन विकास आघाडी व माकप आघाडी कडून प्रमोद कोठेकर यांनी सुद्धा उमेदवारी पदासाठी अर्ज दाखल केला आहे