
दैनिक चालु वार्ता
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी प्रतिनिधी
पुणे :- मंथन फाउंडेशनच्या वतीने नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी, नवी मुंबई येथील सफाई कर्मचाऱ्यांना हिवाळी किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने २ ब्लँकेट, ३ चादरी, मच्छरदानी,मास्क, कोल्ड क्रीम, सॅनिटरी पॅड,१ किलो चहा पावडर, १ किलो साखर, १ किलो फुटाणे या महत्त्वाच्या वस्तू सह वाटप करण्यात आले. थंडी असल्यामुळे त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तसेच विधवा महिला म्हणून फॅमिली साठी उपयोगी अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व महिलांना खूप आनंद झाला.
दरम्यान मंथन फाउंडेशन, हे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी, येथील ट्रक ड्रायव्हर, क्लिनर, हेल्पर, लोडर यांच्यासाठी आरोग्य व एचआयव्ही एड्स, गुप्तरोगावर काम करते.दरम्यान
मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट यांनी महिलांसोबत संवाद साधला, व निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छाया पाटील, कविता गायकवाड, शीतल कोळी, हेमा, मोनिका, पल्लवी, प्रिया, सुप्रिया, स्मिता मंडपमालवी यांचे विशेष सहकार्य लाभले.सदरील कार्यक्रम मसाला मार्केट , मंथन फाउंडेशन ऑफिस मध्ये संपन्न झाला.