
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे की, अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जर लिहून दिलं की असं केलेलं नाही तर एक नाही दोन जोडे मारा. मी माझे जोडे संजय राऊतांना देतो, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या पायातील जोडे हातात घेऊन दाखवले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आज किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.