
दैनिक चालु वार्ता
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी प्रतिनिधी
पुणे :- एमबीसीपीआर संस्थेच्या वतीने एक दिवशीय कार्येशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्येशाळेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर, भीमाशंकर , अंबा-अंबिका (मानमोडी), भूतलिंगा या ठिकाणी बुद्धलेण्यांचा अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. या अभ्यास दौऱ्यात संस्थेच्या टीम ने २ शिलालेखांचा शोध लावला. भीमाशंकर हा १७ बुद्ध लेण्यांचा समूह असून यात १ चैत्यगृह ७ पाण्याच्या टाक्या (पोढ्या) आणि ३ शिलालेख असून अंबा-अंबिका या बुद्धलेण्यात १६ लेण्यांचा समूह असून यामध्ये १ चैत्यगृह, चैतगृहाच्या बाहेर २ स्तूप, १५-१६ शिलालेख आहेत. तसेच भूतलिंगा या बुद्धलेणींत १३ लेण्या आहेत त्यामध्ये १ चैतगृह असून २ शिलालेख आहेत. अंबा-अंबिका आणि भूतलिंगा या लेणी समूहात साधारणपणे २५-३० पाण्याच्या टाक्या (पोढ्या) असू शकतात.असा अंदाज संस्थेने व्यक्त केला आहे.
भूतलिंगा या लेणीच्या चैतगृहाचे द्वार हे अत्यंत सुबक असून त्यावर आपल्याला शिल्पकला पहावयास मिळते. चैतगृहाच्या कमानीवर आपल्याला तथागत बुद्धांची माता राणी महामाया यांचे शिल्प पहावयास मिळते. काही अज्ञानी आणि संधीसाधू व्यक्ती या शिल्पाला मुद्दामहून गजलक्ष्मी चे शिल्प संबोधतात. या शिल्पात आपल्याला राणी माता महामायेवर (गज)हत्ती पुष्पवृष्टीकरताना दिसतात. त्यांच्या (दासी) सेविका माता माहामायेस वंदन करताना हि दिसतात. या शिल्पाच्या वर आपल्याला गरुड राजा आणि नागराजा हे आपले वैर विसरून धम्माला शरण जाताना दिसतात.
या ३ लेणीसमूहाची संपूर्ण माहिती आनंद खरात आणि मनोज गजभार यांनी सांगितली. शिलालेखांचे वाचन आणि माहिती आशिष भोसले, रवी कांबळे, शुध्दोधन बागडे यांनी सांगितली. या अभ्यासदौऱ्यात सूर्यकांत मिसाळ, महायान मसुरे, गिरीश साबळे, आकाश भोले, राजेश सरतापे, कपिल कांबळे, राहुल कांबळे, सिद्धू कांबळे, वर्धन कदम, प्रणव वडमारे, सचिन मस्के , सागर निकम उपस्थित होते. लेणी अभ्यासक सिद्धार्थ कसबे यांनी जुन्नरच्या वतीने आलेल्या सर्व लेणीसंवर्धकांचे आभार मानले.
मनोगत व्यक्त करताना जुन्नर येथील लेण्यांविषयी मनोज गजभार व आनंद खरात यांनी त्या भागातील स्थानिकांना लेणी विषयी माहिती दिली. तसेच या कार्येशाळेत मोठ्या प्रमाणात प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन एमबीसीपीआर संस्थेच्या वतीने करण्यात आले.