
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- सार्वजनिक शिवजन्मोत्सव 2022 निमित्त रंगभरण स्पर्धेचे आयोजन. देगलूर येथील साधना हायस्कूल येथे सर्व विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने योग्य ते शिवाजी महाराजांचे चित्र काढून आपला योगदान दिला यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर मामा भोकसखेडकर, दिगंबर सावकार कौरवार आणि नामदेव पाटील थडके व साधना शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग शाळेतील शिक्षका आधी कर्मचारी त्या ठिकाणी विद्यार्थ्याचे निरीक्षण करीत होते वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करत होते ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला व प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.