
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी करडखेल सर्कल
एकनाथ गाडीवान
देगलूर :- पतंजली योगपीठ हरिद्वार परिवाराच्यावतीने सहा दिवशीय निशुल्क प्रयोग विज्ञान शिबिर सप्ताह साजरा करण्यात आला. दिनांक 7 ते 13/ 2/ 2022 या दरम्यान बोंढार (हवेली) येथे पहाटे पाच ते सात वाजता हनुमान मंदिर खारी मैदान येथे पतंजली योग पीठ परिवाराच्या वतीने निशुल्क योग शिबिर दरम्यान दररोज पतंजली योगपीठ होऊन प्रशिक्षित योग शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले या शिबिरात योगिक जगाग सूर्यनमस्कार बारा प्रकारची दंड असणे व बैठका विविध प्रकारची आसने प्राणायाम ध्यानधारणा मेतून मंत्र मुक्त करत मन बुद्धीच्या सहयोगातून एकाग्रतेचे प्रशिक्षण जिल्हा प्रभारी सुरेश लंगडापुरे यांनी दिली.
त्याच बरोबर योग साधना पुढे नियमित योग वर्ग घेण्यासाठी सह योग शिक्षक साईनाथ तिडके सह योग शिक्षक कुमारी अनुष्का तिडके यांची नियुक्ती व भारत स्वाभिमान ट्रस्ट कार्यकारणीची स्थापना करण्यात आली यावेळी मोफत कॅम्पुटर नेत्रतपासणी चिकित्सक सुभाष जाधव यांनी केली शेवटच्या दिवशी संपूर्ण गावात घरोघरी फिरून व्यसनाधीन असलेल्यांना व्यसनमुक्ती दिंडीतून तंबाखू गुटखा सिगारेट दारू व मांसाहार न करण्याची देव-देवता आई-वडील पूजण्याची शपथ घेऊन व्यसनमुक्तीचा संकल्प करून घेणारे युवा भारत जिल्हा प्रभारी हनुमान जी ढगे व योग शिबिर नियोजक दिलीपराव पाटील तिडके यांनी शेकडो जणांचा करून घेतला.
गोमातेची गोसावी चे महत्व संवाद प्रभारी गोभक्त शैलेंद्र जी नावडे यांनी अत्यंत सुंदर मार्गदर्शन करत गोमूत्र शेण वृत्त व विषमुक्त गुळाने 100% शरीर यूरिक ॲसिड कोलेस्ट्रॉल मुक्त होऊन रोग मुक्त करण्याची माहिती सांगितली. प्रजापिता ब्रह्मकुमारी च्या सेवावृत्ती दत्ता भाई तिडके व गोविंद भाई तिडके यांनी ध्यानधारणेचे महत्त्व विशद करत अध्यात्मिक शक्ती सोबत शरीर रोगमुक्त मुक्ती सहजतेने होते असे प्रतिपादन केले गावात नियमित योग वर्गासाठी दोन दान संघटन मंत्री पंढरीनाथ कंठेवाड यांनी केले तर आदर्श दिनचर्या आहारात विहार घरगुती आयुर्वेदिक उपचाराची माहिती सह योग शिक्षिका तथा आयुर्वेद तज्ञ डॉक्टर नीलिमाताई कोरडेखेले यांनी दिली.
या योग शिबिरात प्रशिक्षण देणारी मुख्य प्रशिक्षक भ.सव ट जिल्हा प्रभारी राम शिव मनोर पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी सुरेश लगडापुरे प्रांत संघटनमंत्री दत्तात्रेय जी काळे युवा भारत जिल्हा प्रभारी हनुमंत ढगे जिल्हा सह प्रभारी अशोक पवार जिल्हा कोषाध्यक्ष महारूद्र माळगे सोशल मीडिया प्रभारी महानंदा माळगे डॉक्टर नीलिमा करडखेले समद प्रभारी सिलेंडर नावडे संघटनमंत्री पंढरीनाथ कंठेवाड डॉक्टर प्रकाश शिंदे प्रा मीराताई पाठक व इतर योग शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा सरपंच प्रतिनिधी आनंदराव पाटील तिडके बोराळकर योग शिबिर मुख्य संयोजक दिलीप राव तिडके तिडके गोविंद्भाई तिडके दत्ता भाई तिडके मुक्ताबाई तिडके दत्त हरी पाटील तिडके रामराव पाटील तिडके जेजेराव पाटील तिडके व्यंकटराव पाटील तिडके पांडुरंग सिताराम पाटील तिडके साईनाथ पाटील तिडके कुमारी अनुष्का तिडके उपसरपंच गोविंद पाटील तिडके प्रभाकर पाटील तिडके व समस्त विद्यार्थी-विद्यार्थिनी गावकऱ्यांनी सहभाग घेऊन योगशिबिर यशस्वी केले.