
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था गेल्या तीन वर्षापासून कोरोनाच्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या कमी होणाऱ्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना कोरोना निर्बंधाबाबत सूचना दिल्या आहेत. राज्य कोरोनावरील कडक निर्बंधाबाबत पुर्नविचार करु शकते आणि अनावश्यक निर्बंध दूर करुन दिलासा देऊ शकतात, याबाबतचे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या सचिवांना लिहिले आहे.
‘राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून दैनंदिन आकडेही कमी येत आहे. जगातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने 10 फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 10 फेब्रुवारीपासून नवे नियम लागू केले आहे. सरकारच्या नव्या नियमावलीनुसार विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईनचे बंधन नसणार आहे.’ असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात म्हटलं आहे.
सुरूवातीच्या काळात कोरोनाची वाढती संख्या पाहता अनेक राज्यांनी विमानतळांवर आणि राज्यातील सीमांवर निर्बंध लावण्यात आले होते. दरम्यान जिथे कोरोना महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्था हातळण्या बरोबरच राज्याचे अर्थचक्र न थांबता कसे सुरळीत चालेल याची देखील काळजी घेणे गरजेचे,’ असल्याचं राजेश भूषण म्हणाले. दरम्यान, ‘सध्याच्या परिस्थितीत देशातील कोरोनाची संख्या कमी होताना दिसत आहे.
त्यामुळे राज्यांनी कोरोनाची परिस्थिती पाहून निर्बंध शिथिल करावे. मात्र असे करत असताना राज्याने हे सुनिश्चित करावे की सर्वत्र कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी 5 टप्प्याचे धोरणाचीही अंमलबजावणी करता येऊ शकते. यासाठी राज्य टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, वैक्सीनेशन आणि
कोरोना अनुरुप व्यवहार यासारखे नियम लावण्यात येऊ शकतात. असं देखील राजेश भूषण यांनी पत्रात सांगितलं आहे.