दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
केज -केज पासून पाच किमी अंतरावर असलेल्या कदम वाडी फाट्या नजीक दोन मोटारसायकल चा समोरासमोर अपघात झाला असून तिघे जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी अंबाजोगाई ला पाठवण्यात आले आहे. सदरील घटना बुधवारी 4 ते साडेचार च्या दरम्यान घडली असून जखमी मध्ये रामचंद्र व सोनाली धायतिडक (बीड) यांचा समावेश असून तिसऱ्या जखमीचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनोळखी जखमी ची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास अंबाजोगाई ला पाठवण्यात आले आहे. सदरील अपघात झाल्यानंतर 108 चे पायलट बारगजे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.