
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
ज्यांची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहात आहेत. या 7 चित्रपटांमध्ये गंगूबाई काठियावाडी, लाल सिंह चड्ढा, जर्सी, रक्षाबंधन, भूल भुलैया 2, अटॅक आणि आरआरआर यांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीखही निश्चित करण्यात आली असून हे सर्व चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचेही समोर आलं आहे. या सर्व चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांवर एक नजर टाकूया गंगूबाई काठियावाडी – आलिया भट्टचा बहुप्रतीक्षित चित्रपट य’गंगुबाई काठियावाडी’ येत्या 25 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
अटॅक :- जॉन अब्राहम, रकुल प्रीत सिंह आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर ‘अटॅक’ ची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. चित्रपटाचा पहिला भाग 1 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
जर्सी :- शाहिद कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘जर्सी’ ची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण हा चित्रपट आता 14 एप्रिलला चित्रपटमध्ये प्रदर्शित होणार आहे.
भूल भुलैया 2 :- कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्या ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट अक्षय कुमार,विद्या बालनच्या ‘भूल भुलैया’चा दुसरा भाग आहे. हा चित्रपट 20 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
लाल सिंह चड्ढा :- आमिर खानच्या बहुप्रतीक्षित ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. यापूर्वी हा चित्रपट 14 एप्रिल 2022 ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु आता हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.