
दैनिक चालु वार्ता
प्रा .मिलिंद खरात
पालघर प्रतिनिधी
गारगाव ग्रामपंचायत मधील टोपले पाडा ते पाटील पाडा ते म्हसेपाडा रस्ता लवकर होणार अनंता वनगा आ.मुं.मो.सा .स.अध्यक्ष
वाडा तालुका :- गारगाव ग्रामपंचायत मधील टोपलेपाडा ते पाटीलपाड्याचा ओहोळ रस्ता ते पाटीलपाड्याचा ओहोळ ते म्हसेपाडा रस्त्याचे ३/२ चे प्रस्ताव सादर करण्यात आले. २०१४ मध्ये विक्रमगड तहसिल कार्यालय समोर आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने म्हसेपाड्यातील आमच्या सर्व ग्रामस्थांना सोबत घेवुन आमरण उपोषण केले होते त्या उपोषणाची तत्काळ दखल घेवुन आमच्या म्हसेपाड्यात विजेची सोय करण्यात आली होती.
त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष मा. अनंता वनगा साहेब व पदाधिकारी यांनी आमच्या म्हसेपाडा गावाची पाहणी केली त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की , म्हसेपाड्यात जाण्या-येण्यासाठी रस्ताच नाही,दोन्ही बाजुस दोन मोठ्या नद्या आहेत,त्यानंतर आमच्या पाड्यातील सर्वांनाच सोबत घेवुन अनंता वनगा साहेब यांनी उपवनसंरक्षक जव्हार, ग्रामपंचायत गारगाव,पंचायत समिती वाडा,वनविभाग पुर्व वाडा यांच्याकडे पत्रव्यवहार सुरु केला.
अनेक अडचणी आल्या परंतु वनगा साहेब आमच्या म्हसेपाडा लोकांसोबत राहले व पाठपुरावा चालुच ठेवला,खाजगी जमिन मालकांच्या सहमती, ग्रामपंचायतचे ठराव, पंचायत समितीचे अहवाल,वनविभागाचे प्रस्ताव हे सगळे अनंता वनगा साहेबांनी जातीने लक्ष देवुन करुन घेतले. जवळजवळ सर्वच अडचण दुर झाल्या आहेत वन विभागाचे जाधव दादा,वाघमारे दादा व पं समितीच्या अधिकाऱ्यांसोबत रस्त्याचे मोजमाप घेताना आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मा.अनंता वनगा साहेब व पालघर जिल्हा कमिटी अध्यक्ष मा. अरुण खुलात साहेब(नगरसेवक पाणी पुरवठा सभापती वाडा नगरपंचायत) हे उपस्थित होते.
आज सोमवार दि. १४/०२/२०२२ रोजी आमच्या म्हसेपाड्यातील ग्रामस्थांना सोबत घेवुन अनंता वनगा साहेब व अरुण खुलात साहेब हे दिवसभर आमच्या सोबत होते. वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब,बांधकाम विभागाचे उपअभियंता निमजे साहेब व पंचायत समिती वाडा रोजगार हमी योजना शाखा अभियंता सुशिल कटारे साहेब यांच्या सोबत अनंता वनगा साहेब यांनी चर्चा करुन ३/२ च्या प्रस्तावावर सह्या घेतल्या.
त्यानंतर वाडा पुर्व वनविभाग कार्यालयात आम्ही सर्व जण वनगा साहेबांबरोबर गेलो , पंचायत समिती वाडा रोजगार हमी योजना शाखा अभियंता सुशिल कटारे साहेब यांनी वाडा पुर्व वनविभाग कार्यालयाच्या अधिकारी रोडगे मँडम यांच्याकडे ३/२ चा प्रस्ताव सादर केला. रोडगे मँडम म्हणाल्या की लवकरच सदर प्रस्तावाची कार्यवाही पुर्ण करुन जागेच्या मंजुरी साठी जव्हारला उपवनसंरक्षक वनविभागाकडे पाठवण्यात येईल,जव्हार कार्यालयाची मान्यता मिळताच लवकरच रस्त्याला सुरुवात होईल असे पंचायत समिती वाडा रोजगार हमी योजना शाखा अभियंता सुशिल कटारे साहेब म्हणाले.
आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मा. अनंता वनगा साहेब पालघर जिल्हा कमिटी अध्यक्ष मा. अरुण खुलात साहेब यांनी आज दिवसभर आमच्या सोबत राहुन पाठपुरावा केला लवकरच त्यांच्या पाठपुराव्यामुळे आम्हाला रस्ता मिळेल ही आशा आहे.