
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधि बारामती
रियाज़ शेख
बारामती, ता. १६ :- येथील नगरपालिकेचा कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला सन २०२२-२०२३ चा ११९६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी (ता. १६) सादर केला. त्यामध्ये १५ लाख ४८ हजार रुपये शिलकी दाखविण्यात आले असून, नगरपालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला आहे. बारामती नगरपालिकेच्या इतिहासातील हा १५७ वा अर्थसंकल्प होता. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे होत्या. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी अर्थसंकल्प सादर केला.
ज्येष्ठ नगरसेवक यांनी प्रस्ताव मांडला; तर गटनेते सचिन सातव यांनी त्याला अनुमोदन दिले. आगामी वर्षात शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले गेले असून, त्यासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता या दोन विषयांना अर्थसंकल्पात विशेष महत्त्व दिले असून शहराच्या सुशोभीकरणासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्प दृष्टिक्षेपात…
● बृहत् बारामती पाणीपुरवठा योजनेसाठी १५६ कोटींची तरतूद, नवीन आठ टाक्या उभारल्या जाणार, जळोची तांदूळवाडी येथे नवीन साठवण तलाव निर्मिती.
• नियोजित शिवसृष्टीसाठी ८० कोटींची तरतूद-पहिल्या टप्प्यात रायगड राजसदर, छत्रपती शिवाजी महाराज समाधी, मेघडंबरीतील महाराजांचा पुतळा तयार होणार.
• कन्हा नदी सुधार प्रकल्पाची व्याप्ती मेडदपर्यंत वाढवली ९० कोटींची तरतूद.
• नीरा डावा कालवा सुशोभीकरणाअंतर्गत साठवण तलाव ते जळोची साठवण तलावापर्यंत १५ ठिकाणी विरंगुळा केंद्र, पाच ठिकाणी
पुलांसाठी १० कोटींची तरतूद.
● श्रीमंत बाबूजी नाईक वाडा कामासाठी २० कोटींची तरतूद.
• मुस्लिम समाज शादीखाना, महिला जलतरण तलाव व महिला बालकल्याण साठी प्रत्येकी पाच कोटींची तरतूद.
● वसंतराव पवार • नाट्यगृहासाठी ६५ कोटी, इंदापूर चौक शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी ४० कोटींची तरतूद.
● चौक सुशोभीकरण, नवीन उद्याननिर्मिती व राष्ट्रपुरुष पुतळे उभारणीसाठी पाच कोटी.
• दफनभूमी, दहनभूमी गॅसदाहिनी निर्मिती पाच कोटी.