
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
बुगेवाडी-पारनेर :- गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ रोजी बुगेवाडी, पारनेर तालुका पारनेर येथे जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन दोन खोल्या इमारत बांधकाम करणे करीता १८.२५ लक्ष रुपयांचा निधी असलेल्या खोल्यांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले होते.प्रमुख उपस्थिती मध्ये शहर प्रमुख निलेश खोडदे, नगरसेवक युवराज पठारे ,नवनाथ सोबले, राजू शेख, भाऊ ठुबे, ऋषी गंधाडे, कांतीलाल ठाणगे उपस्थित होते. यावेळी बोलताना सभापती दाते सर म्हणाले,बुगेवाडी येथील शाळाखोल्या निर्लेखित झालेले आहेत.विद्यार्थ्यांना बसण्याची सोय नव्हती.शहर प्रमुख निलेश खोडदे आणि नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ सोबले यांनी या खोल्या देण्याची वारंवार मागणी तसेच गावातील ग्रामस्थांनी ही केली होती.
त्यामुळे मागील आर्थिक वर्षात एक शाळा खोली आणि चालू आर्थिक वर्षात एक शाळा खोली अशा दोन शाळा खोल्यांना १८.२५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.त्यामुळे मुलांचा बसण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे ते पवित्र काम आपल्या हातून झाले त्याचे समाधान मला नक्कीच आहे. जिल्हा परिषद मध्ये शिवसेनेचे सदस्य संख्या कमी आहे तरी आम्ही सर्व सदस्य कामे खेचून आणतो त्यामुळे नगरपंचायत मध्ये तुम्ही सहा सदस्य आहेत काळजी करू नका.आम्ही पदाधिकारी तुमच्या बरोबर आहोत तुम्हीसुद्धा तुमच्या प्रभागांमध्ये विकास करण्यात कोठेही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे.
शिवसेनेचे मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब नगर विकास खात्याचे मंत्री आहेत. वेळ आल्यास आपण त्यांच्याकडून निधी आणु अशी ग्वाही सभापती दाते सर यांनी दिली.पारनेर तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत जनता विकासा बरोबरच राहिल अशा आशावादही सभापती दाते सर यांनी व्यक्त केला.शहर प्रमुख नीलेश खोडदे,नगरसेवक युवराज पठारे , नवनाथ सोबले यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी सखाराम कावरे, शिवाजी काळे, राजेंद्र कावरे, बाळू बुगे, शरद कावरे, रामदास कावरे, बाबुराव बुगे, रामदास वाळुंज, भुजंग घोलप, नितीन औटी, चंद्रभान कावरे, कुंडलिक कावरे ,बापू बुगे, मंगेश कावरे, गणेश बुगे, दिपक थोरात, नरेंद्र कावरे, सुरज बुगे, सोपान कावरे, मच्छिंद्र कावरे, बाबासाहेब कावरे, किशोर मस्के, प्रवीण कावरे, प्रशांत कावरे, सर्जेराव वाळुंज, विजय कावरे, विजय देवराम कावरे, मोहन कावरे, वेदांत कावरे, सुनील कावरे, संभाजी बुगे, बाबा बुगे, भानुदास कावरे, लक्ष्मण कावरे, काकडे मॅडम, कामाचे ठेकेदार प्रताप अंबुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबाजी बुगे यांनी केले तर आभार नगरसेवक नवनाथ सोबले यांनी मानले.
आम्ही शिवसेनेचे सहा नगरसेवक असून एकसंघ आहोत नगरपंचायत मध्ये कामे करण्यास आम्ही कोठेही कमी पडणार नाही पारनेरच्या जनतेचा कौल शिवसेनेलाच आहे त्यामुळे कुठल्याही दबावाच्या राजकारणाला बळी न पडता आम्ही दाखवून देऊ तालुक्यात युवकांचे संघटन उभे करू : नगरसेवक युवराज पठारे