
दैनिक चालु वार्ता
वसमत :- क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे मूर्ती दिन साजरा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपादित आळणे मिलिंद गुरुनाथ गाडेकर यांनी क्रांतिगुरू लहुजी साळवे स्मृतिदिन साजरा करण्यात आला भारत मातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झाले त्याच ठिकाणी क्रांतिकारी क्रांतिवीर लहुजी नी 17 नोव्हेंबर 1871 ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली श्रद्धांजली अर्पण करून करतानाच त्यांनी मरेन तर देशासाठी आणि जगेन तर तरीही देशासाठी अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा ही केली होती.
त्यांनी अनेक देशभक्तांना आपल्यातील युद्ध कला शिकवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजी चे पूर्वज पराक्रम गाजवीत साळवे घराणे शस्त्र विद्या मध्ये निपून व तरबेज होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहुजी च्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदार्या सोपविल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांच्या आजोबा कडे सोपविली होती पुरंदर किल्ल्याच्या रक्षणासाठी साळवे घराण्यात घराण्यातील अनेक वीरांनी वीर पुरुषांनी आपल्या प्राणांची अवती दिली होती.
कृष्ट कामगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना राऊत या पदवीने गौरविले होते क्रांतिकारी क्रांतिगुरू लहुजी हे दांडपट्टा चालविणे तलवारबाजी घोडेस्वारी बंदूक चालविणे निशान बाजी अशा सर्व युद्ध कौशल्यात निपुण होते त्यांचे पिवळा शरीर व उभारलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असेल जीवघेण्या शास्त्रा बरोबर ते अगदी एखाद्या खेळण्या प्रमाणे खेळत असत आपल्या वडिलांच्या मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव त्यांना रसायन झाला पराक्रमी घराण्यातील लहुजी नि इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजेच पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी मवाळ पंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारी निर्माण करण्याचे ठरविले आहे.
त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्याचे ठरवले देशातील पहिले युद्धकौशल्य तालीम केंद्र उघडले. या प्रशिक्षण केंद्रात केंद्रात सर्वच समाजातील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले यावेळी संकेत गायकवाड, मुन्ना गायकवाड ,श्रीकांत गायकवाड ,आर्यन गायकवाड, विजय वैरागडे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.