दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे २०२४ ची विधानसभा निवडणूक लढणार असल्याने मिनी विधानसभा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या जि.प.व प.स. निवडणूका एकनाथ दादा पवार मित्र मंडळ पुर्ण ताकदीने लढणार असल्याची माहिती एकनाथ दादा पवार यांनी दिली. दोन वर्षापासून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ गावभेटी घेऊन कार्यकर्त्यांची जुळवाजुळव केली. अनेकांच्या आडीआडचणी सोडवून लोहा कंधार येथील सुशिक्षित बेरोजगार युवक तरुणांच्या हाताला कामे उपलब्ध करून दिली. यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे आयकॉन म्हणून एकनाथ पवार यांच्याकडे पाहिले जात आहे.
येणाऱ्या जि.प. व प.स. निवडणूका लढणार असल्याचे जाहीर करताच नवतरुण वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. यामुळे कार्यकर्ते स्वतः होऊन एकनाथ दादा पवार मित्र मंडळाकडून निवडणूक लढवणार असल्याचे सांगत आहेत. एकनाथ पवार यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित असलेले मुरंबीचे सरपंच राम पाटील पवार हे एकनाथ पवार यांनी आदेश दिल्यास सावरगाव जि.प.गटातून पंचायत समिती निवडणूक संपुर्ण ताकतीने लढवणार असल्याची माहिती सरपंच राम पाटील पवार यांनी दिली.