
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी आर्णी
श्री.रमेश राठोड
सावळी सदोबा :- जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यकाळ आगामी सण २०२२ फेब्रुवारी मध्ये संपत असून,कोरोणाचे संकट कमी झाल्याने निवडणुका नक्की होणार असल्याने,सर्वच पक्षाकडून इच्छुक निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागले असल्याचे, त्यांचे चित्र विविध पक्षाच्या पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमा मधून पाहायला मिळत आहे, निवडणुका वेळेवरच होणार असल्याचे स्नेहा मिलनातून राजकीय शक्ती प्रदर्शन करण्याचे काम केले जात आहे.
सावळी सदोबा परिसरामध्ये गुलाबी थंडीतही सायंकाळी विविध पक्षाच्या राजकीय नेत्या बरोबर पद अधिकाऱ्याकडून स्नेहामिलनाचे कार्यक्रम आयोजित केली जात आहे, या कार्यक्रमात विविध पक्षाचे पदाधिकारी एकत्र येतात, निवडणुकीच्या अनुषंगाने गण, गटातील तिकीट आपल्या पदरी कसे मिळेल, कोणत्या नेत्याचे वजन किती आहेत यासंदर्भात राजकीय चर्चा रंगल्या जात आहे,सावळी-ईचोरा जि. प.सर्कल मध्ये अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने संभाव्य उमेदवाराकडून स्नेहमिलन कार्यक्रम आयोजन करून कार्यकर्त्यांची मोट बांधली जात आहे.
काही ठिकाणी कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश सोहळेही रंगवल्या जात आहे,काही इच्छुक उमेदवाराकडून आपल्या गटात व गणातील गावात भेटी देऊन मतदाराचा आशीर्वाद घेतांना दिसत आहेत, तालुक्यात सध्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या समूहात शांतता असली तरी भाजपा,शिवसेना व राष्ट्रवादीकडून मात्र दंड बैठका सुरू केल्या आहेत,आर्णी तालुक्यात मागील जि.प निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस 3 तर भारतीय जनता पक्षाने एक जागा जिंकली होती, पंचायत समिती निवडणुकीमध्ये तालुक्यातील आठ जागेपैकी चार काँग्रेस तर दोन शिवसेना दोन भारतीय जनता पक्षाकडे होत्या.