
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे, दि. 17: निगडी वाहतूक विभागांतर्गत पवळे उड्डाणपुलाचे रंगरगोटी व स्थापक विषयक कामे सुरु असल्यामुळे 2 मार्चपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. पुण्याकडून येणारी पवळे पुलावरुन जाणारी वाहने पुलावरुन न जाता डाव्या बाजूच्या ग्रेडसेपरेटरच्या आऊटलेन मधून बाहेर काढून प्रेस्टीज कॉम्प्लेक्ससमोरुन टिळक चौकामार्गे सर्व्हिस मार्गाने निगडी प्राधिकरण चौकी समोरुन पुढे सरळ पुलावर जाणार आहे.
मुंबईकडून येणारी वाहने पवळे उडाणपूल निगडी गावठाण हनुमान मंदीराशेजारी पंक्चरमधून टिळक चौकाकडे बाहेर पडणार आहे. वाहतूक बदलाबाबत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतूक पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.
000