
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
लखनऊ :- सध्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी सभा, रॅलींचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर अनेक राजकारणी आणि त्यांच्या पक्षांना कलाकार देखील पाठिंबा देत आहेत. या सगळ्यात बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने यूपी विधानसभा निवडणुकीबाबत तिची प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच गरिबांसाठी एक वक्तव्य केलं आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
ही पोस्ट शेअर करत कंगनाने देशाच्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर तिचं मतं मांडत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तिने पाठिंबा दिला आहे. ‘गरिबांचे स्वप्न पूर्ण झाले, लाखो लोकांना स्वतःचे घर मिळाले. तुमचे एक मत गरीब आणि गरजू लोकांचे प्राण वाचवू शकते कारण योगी जिंकतील, तर यूपी जिंकेल, असे कॅप्शन कंगनाने दिले आहे. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.