
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा दि .18 :- नांदुरा शहरातील स्टेशन चौकापासुन सुरू असलेले नालीचे बांधकाम अतिशय संथ म्हणजे कासवतीगतीने सुरू आहे. अर्थात ह्यावेळी नाली बांधकामाच्या आजुबाजुला साचलेल्या घान पाण्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते!तसेच घराच्या समोर साचलेल्या पाण्यामुळे काही वाईट घटना घडू शकते. बुलडाणा रोडवर रात्रंदिवस सुरू असलेले नाली बांधकाम बऱ्याच दिवसापासून बंद आहे. बांधकाम झालेल्या नाल्यावर क्युरींग करीता झालेल्या बांधकामावर पाण्याचा थेंबही मारण्यात येत नाही म्हणजे बांधकाम कीती सुमार दर्जाचे होईल याची कल्पनाच न केलेली बरी. रोड ते नाली बांधकामाचे मध्ये मुरूम टाकणे आवश्यक असतांना चक्क काळी माती भराईसाठी वापरण्यात येत आहे.
जुनी नालीवर किंवा वाढीव जागेत बांधकाम होणे आवश्यक असतांना जुन्या नालिच्या आंत बांधकाम सुरू आहे. ह्याबाबत मात्र लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सचिन तायडे यांच्याशी संपर्क केला असता. ती जागा युटीलीटी करीता सोडली असल्याचे त्यांनी सांगितले. ह्याबाबत लोकांना प्रचंड असंतोष असुन लोकप्रतिनिधीनी कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.