
दैनिक चालु वार्ता
उदगीर प्रतिनिधी
अतनूर ता. जळकोट :- येथे शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी गंगाधर वाघमारे तर उपाध्यक्षपदी राहुल गायकवाड तसेच सचिवपदी एकनाथ गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. शिवजन्मोत्सव समितीची बैठक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. दि.१९ फेब्रुवारीस सकाळी ७:०० वाजता रांगोळी स्पर्धा होणार असून प्रथम पारितोषिक ७५१ रुपये, द्वितीय पारितोषिक ५५१ रुपये, तृतीय पारितोषिक ३५१ रुपये असून निरीक्षक म्हणून ईश्वर कुलकर्णी, विजय चव्हाण, मनोहर मुगदळे हे काम पाहतील.
तसेच दि.१९ फेब्रुवारीला सकाळी ०९:४५ वाजता आई तुळजाभवानी माता पूजन, सकाळी १०:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओठ्याचे ज्ञानेश्वर जाधव, माधव बोंडगे, नितीन सोमुसे यांच्या हस्ते पूजन, सकाळी १०:१० वाजता जळकोट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या हस्ते भगवा ध्वज ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन समिती अध्यक्ष गंगाधर वाघमारे, शिवसेनेचे जळकोट तालुका उपप्रमुख विकास सोमुसे-पाटील, पंकज गायकवाड यांच्या शुभहस्ते होणार आहे.
दि.२० फेब्रुवारीला सकाळी ११:०० वाजता भव्य रक्तदान शिबिर आयोजन सार्वजनिक शिवजन्मोत्सव २०२२ अतनूर समिती, अर्पण ब्लड बँक लातूर व प्राथमिक आरोग्य केंद्र अतनूर अंतर्गत रुग्णांची हिमोग्लोबिन एच.बी. रक्त तपासणी डॉ.माधवी जाधव, डॉ.मणियार, टेक्निशियन चंद्रकांत राठोड, व्यवस्थापक गौतम गायकवाड, सौरभ शिकारी, विशाल कांबळे, रवी पांचाळ, गोविंद बारसुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
दि.२१ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी भव्य शिव व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आली असून प्रसिद्ध शिव व्याख्याते प्रा.विशाल गरड सोलापूरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी कॉंग्रेसचे लातूर जिल्हाअध्यक्ष तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळकोट तालुका अध्यक्ष व पत्रकार बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.डॉ.सुधाकर भालेराव, शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख बालाजी भाऊ रेड्डी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जळकोट तालुकाअध्यक्ष तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मारोती पांडे, आरपीआयचे लातूर जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव राठोड उपस्थित राहणार आहेत.
याचा लाभ अतनूर परिसरातील तांडा, वस्ती, वाडीतील शिवप्रेमींनी घ्यावा असे आव्हान शिवजयंती मंडळ नियोजक तथा महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे जळकोट तालुका अध्यक्ष व काँग्रेसचे घोणसी विभाग प्रमुख कैलास सोमुसे-पाटील अतनूरकर, शिवजयंती मंडळ मार्गदर्शक तथा शिवसेनेचे व युवा सेनेचे जळकोट तालुका सरचिटणीस मुक्तेश्वर येवरे-पाटील अतनूरकर, शिवभक्त विनोद सोमुसे, मयुर हिंगणे, श्रीकांत बंडेवार, सुदाम बाबर, अविनाश शिंदे, बालाजी येवरे, बळवंत भांगे, गजानन सोमुसे, योगेश चव्हाण, रवि कापडे, सचिन बोडेवार, शिल्पकार गायकवाड तसेच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती २०२२ अतनूर व समस्त गावकरी मंडळ अतनूर यांनी केले आहे.