
दैनिक चालु वार्ता
भंडारा प्रतिनिधी
राजेश गेडाम
भंडारा :- भारतीय युवा खेल परिषद गोवा यांच्या द्वारे एथलेटिक्स च्या राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये विदर्भ हाऊसिंग बोर्ड कॉलोनी येथील देवांशु मनोज खंगार याने 14 वर्ष वयोगटात 600मी.धावणे यात द्वितीय क्रमांक पटकावला त्याबद्दल कॉलनीतील गणेश मंडळातील सभासदांनी तसेच संत शिवराम शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंदानी देवांशु चा सत्कार करून 20500 रुपये रोख बक्षीस देण्यात आले तसेच अमोल तुमाणे यांनी रनिंग शूज भेट दिली.
झालेल्या स्पर्धेतून देवांशु खंगार याची निवड नेपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता झाली आहे त्याचा या यशाबद्दल गणेश मंडळाचे सभासद,अमोल तुमाणे,रामरतन क्रीपान,राकेश हटवार,आनंद माहुले, बाळा माहुले,अवी चेटूले,जगन मस्के,डॉ बोधनकर,गजानन धोटे,प्रेमलाल खंगार,मनोज खंगार,अनिल चरडे, विलास पत्रे,सुधाकर बोकडे,आशिष खेडीकर,अविनाश भुरे,राजू चापेकर,यांनी अभिनंदन करून स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.