
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
अक्कलकुवा :- यात्रेनिमित्ताने दि.16 रोजी संध्याकाळी अक्कलकुवा गंगापूर, काकरपाडा येथील ग्रामस्थ तगदरावांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली असुन यात्रे मध्ये मनोरंजनासाठी लहान मोठया पालख्या,मौत का कुवा, सर्कस संसारोपयोगी साहित्य,भांड्यांची दुकाने, लहान मुलांच्या खेळणीची दुकाने,सौन्दर्य उपयोगी साहित्याची दुकाने,हॉटेल्स,रसवंती गृहे, फुगेवाले,संत्रा, केळी, रताळी आदी वस्तूंची दुकाने लावण्यात आली आहे.केवळ महाराष्ट्रातुनच नव्हे तर मध्य प्रदेश व गुजरात राज्यांतून भाविक व व्यावसायिक दाखल झाले आहेत.
सातपुड्यातुन मोठ्या संख्येने बैल विक्री साठी दाखल झाले असुन या बैल बाजारावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण असते.बैल बाजारात बैलांच्या खरेदी विक्रीतुन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते, तसेच शेतीच्या व्यवसायात दळण वळणाची मदत व्हावी व उत्पन्नात वाढ व्हावी याकरीता लाकडी व लोखंडी स्वरूपातील बैलगाड्या देखील या ठिकाणी मोठया प्रमाणावर विक्रीसाठी झाल्या आहेत.
श्री महाकालीका माता मंदिराचे विश्वस्त मंडळ कार्यरत आहेत. यात्रोत्सवाच्या यशस्वितेसाठी संपुर्ण विश्वस्त मंडळ परिश्रम घेत आहेत. ६० हजार किंमतीला बैलजोडी विकली गेली विक्रेता- नरपत सोन्या पाडवी, गाव -साखलीउमर खरीदार- नंदु सुभाष निकम, गाव- हंनुमतखेडा किंमत ६० हजार जोडी दि.17 पर्यत 1कोटी 65 लाख आर्थिक उलाढाल झाली.