
दैनिक चालु वार्ता
भंडारा प्रतिनिधी
राजेश गेडाम
भंडारा :- मॅथ्स ऑलंम्पियाड परीक्षेत शाळेतील एकूण ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी एकूण ३२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत येऊन शाळेचे नाव गौरवान्वित केले. यात विद्यार्थ्यांनी १२ सुवर्ण पदक, १० रजत पदक, आणि १० कास्य पदक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विद्यार्थ्यांचा या यशाबद्दल संस्थापक मा. खा. सुनिलजी मेंढे शाळेच्या प्राचार्या शेफाली पाल, कल्पना जांगडे, समृद्धी गंगाखेडकर, यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विदयार्थ्यांना मॅथ्स ऑलंम्पियाड परीक्षेचे मार्गदर्शन सौ. ज्योती साखरकर आणि सौ. पूजा मानकर यांनी केले.