
दैनिक चालु वार्ता
मुक्ताईनगर प्रतिनिधी
सुमित शर्मा
मुक्ताईनगर (जळगाव) :- येथील जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय शांतीलाल पवार यांना राज्य स्तरीय तापी पूर्णा आदर्श अधिकारी पुरस्कार डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे नुकताच जाहीर करण्यात आला. शिव बाल किशोर मराठी साहित्य संमेलनात सदर पुरस्काराचे वितरण दि 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणुन काम केले आहे.
तसेच कोरोना काळात प्रभारी उपशिक्षणाधिकारी म्हणुन कामकाज करतांना कोरोना काळातील शिक्षण बाबत ऑनलाईन प्रशिक्षण, आपला जिल्हा -आपले उपक्रम डिजिटल बुक यासारखे विविध उपक्रम राबविले आहेत. विविध शैक्षणिक उपक्रम, शिक्षक मार्गदर्शन तसेच सामाजिक कार्यासाठी जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.