
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या घरी जाऊन त्यांना राज्याचा सर्वांत मोठा नागरी पुरस्कार ‘आसाम वैभव’ने सन्मानित केलं आहे. रतन टाटांना हा पुरस्कार याआधी 24 जानेवारी रोजी गुवाहाटीमध्ये आयोजित एका कार्यक्रमातच दिला जाणं अपेक्षित होतं. मात्र, काही वैयक्तिक कारणास्तव ते त्या कार्यक्रमात सामील होऊ शकले नाहीत.
आसाम सरकारने आपल्या या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील 19 लोकांची निवड केली होती. यामध्ये कोरोनाकाळातील फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासोबतच उद्योजक देखील सामील होते. रतन टाटांच्या समवेतच आणखी पाच जणांना ‘आसाम सौरव’ आणि 12 जणांना ‘आसाम गौरव’ने सन्मानित करण्यात आलं.