
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती 2022 देगलूर यांच्या वतीने सप्तगिरी पोद्दार हायस्कूल देगलूर या शाळेमध्ये चित्रकला व रंगभरण या स्पर्धेत चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये पोद्दार स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते नववी तील सर्व विद्यार्थी सहभाग नोंदवला होता. यामध्ये पहिली ते पाचवी एक गट सहावी ते आठवी दुसरा गट व नववी दहावीसाठी तिसरा गट अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा विभागून शाळेमध्ये आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील घडलेल्या घटना या विद्यार्थ्यांनी आपल्या चित्राच्या माध्यमातून रेखाटलेले होते. याच्या यासाठी शाळेचे प्राचार्य श्री दिगंबर शेकापुरे सर व सर्व शिक्षकवृंद आणि सार्वजनिक जन्मोत्सव समिती 2022 देगलूर यांनी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. या शाळेने आगळा-वेगळा असा उपक्रम राबविला तसेच. या देगलूर परिसरातील सर्व शाळांनी या शाळेचा आदर्श घेऊन आपापल्या शाळेमध्ये असे नवनवीन उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा.