दैनिक चालु वार्ता
भिगवन प्रतिनिधि
जुबेर शेख
भिगवन :- कै. संदेश तानाजी कदम व मुक्ताई ब्लड सेंटर, इंदापुर यांच्या संयुक्त विद्यमानाने भिगवन स्टेशन येथील सीताराम नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रदीप दिवेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.या वेळी एकून 62 लोकांनी रक्तदान शिबिर मधे सहभाग घेतला. यावेळी महिलांनी देखील लक्षणीय सहभाग घेतला होता.यावेळी प्रत्येक रक्तदात्यास एक वर्षा करीता पाच लाखचा अपघाती विमा मोफत देण्यात आला.
“रक्तदान हे एक सामाजिक कर्तव्य आहे आणि ते आपण सर्वांनी सामाजिक जबाबदारी समजून पार पाडायला पाहिजे आता आपण रक्त देण्यास योग्य आहे किंवा नाही हे कसे समजते ,तर आपल्या पूर्ण शरीराची वैद्यकीय तपासणी करूनच रक्तदाता रक्त देण्यासाठी योग्य आहे किंवा योग्य आहे हे ठरविले जाते.
रक्तदान करताना व्यक्तीचे वय 18 पेक्षा जास्त व 65 पेक्षा कमी असावा. वजन सर्वसाधारणपणे 45 किलोग्रामच्यावर असावा”, असे मत डॉक्टर अक्षय राऊत यांनी व्यक्त केले.यावेळी मुक्ताई ब्लड सेंटर, इंदापुर यांच्या वतीने संकेत बनकर, सूरज टिंगरे, बसवराज नवताके, संदीप गीजगे, अमन शेख उपस्थित होते. या रक्तदान शिबिरासाठी आदेश वाघमारे, करण, सुयश देशमुख,अभी जाधव,अक्षय नागवडे यश जाधव,नितीन शेंडगे, उमेश देसाई, राहुल शिंदे, किरण वीर,संदेश शेलार,आकाश दंडवते, संकेत पांढरे रिषभ निंबाळकर, बंडू पानसरे तसेच कदम परिवार यांनी आयोजन करुण समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला.